गगनबावडा ( प्रतिनिधी ) – आज रोजी गगनबावडा तालुक्यामध्ये नूतन भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा दौरा झाला. येत्या काही दिवसात जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा दौरा संपूर्ण जिल्हाभर असून या दौऱ्याला सुरुवात गगनबावड्यातून करण्यात आली. या दौऱ्या वेळी नूतन जिल्हाध्यक्ष यांचा KDCC बँक माजी चेअरमन पी.जी. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्कार समयी तालुक्यातील अनेक भाजपच्या नेते मंडळींनी हजेरी लावली. या दौऱ्यामध्ये भाजप नूतन जिल्हाध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढील येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुथवाईज जोरात पक्षवाढीच्या कामास सुरुवात कोणाच्याही दबावाला बळी न पडता करण्यास सांगितले व गगनबावडा तालुक्यामध्ये पक्ष बांधणीत जोर यावा यासाठी मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हाध्यक्ष यांनी भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे यांना गगनबावडा तालुक्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावून पक्ष मोठा करा त्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे असे ते म्हणाले .

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तालुकाध्यक्ष स्वप्निल शिंदे , मेघाराणी जाधव व अनिल पडवळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .