कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती मैदानात उतरणार का ? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. यावरुन खुद्द श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ही स्पष्टपणे माहिती दिली नसली तरी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेसंदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेली ‘ब्रेकिंग न्यूज’ लवकरच येणार आहे. मात्र ती केवळ न्युज नाही तर एक जबाबदारी सुद्धा असेल असं म्हटलं आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोल होते.


पुढे बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळतंय. दिल्लीमध्ये काय होईल हे मला माहीत नाही. मी या दृष्टीनं कधीच दिल्लीला गेलो नाही आणि मुंबईलाही गेलो नाही. मी कोल्हापूरमध्ये शांत बसून आहे.

मात्र सर्वांची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे. असं ही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर करांना ही महाविकास आघाडीच्या गोटात नेमकं काय सुरु आहे. याबाबत अंदाज येऊ लागला आहे.