कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – सध्या कोल्हापुरातील उत्तर मतदारसंघ हा चांगलाचं चर्चेत आलाय. विधानसभेच्या अनुषंगाने या मतदारसंघात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा या मतदारसंघातून तिढा काही सुटायचा नाव घेत नाहीय. काही दिवसापूर्वी राजेश लाटकर यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिल्यांनंतर पुन्हा ती उमेदवारी मधुरिमाराजे यांना जाहीर करण्यात आली. यानंतर काँग्रेसच्या या निर्णयावर राजेश लाटकर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता महत्वाची बातमी समोर येत आहे. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
काही दिवसापूर्वी सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांची भेट घालून त्यांची समजूत काढली असल्याची चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आज राजेश लाटकर हे आपला उमेदवारी माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. अशातच आता मधुरिमा राजे यांच्या उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने महाविकास आघाडीचा मोठा धक्का बसला आहे. आता महाविकास आघाडीला उत्तर मतदार संघाचा पेच कायम असल्याचे दिसून येत आहे. आता उत्तर मतदार संघातून काँग्रेसमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळणार की नवीन उमेदवारराला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.