सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जो पर्यंत जनता निर्णय देत नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणार नाही, मी प्रत्येक घराघरात गल्लीबोळात जाईन, जनतेचा निकाल येईल पर्यंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणार नाही. असे ते म्हणाले


येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवार यांच्या या घोषणेचे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि दिल्लीच्या जनतेमध्ये काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.