मुंबई ( प्रतिनिधी ) : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईने जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला आणि कर्णधार रजत पाटीदारच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्यांनी या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमावून 174 धावा केल्या. पाटीदारने या सामन्यात आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि अवघ्या 40 चेंडूत 81 धावा केल्या. मुंबईने हा सामना 5 विकेटने जिंकला. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 48 धावांची खेळी केली. याशिवाय सुर्यांश शेजे याने अवघ्या 15 चेंडूत 36 धावा करत संघाचा तारणहार ठरला. सुर्यांश शेजेला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने 3 चौकार आणि 3 षटकारच्या मदतीने 6 चेंडूत 30 धावा केल्या.
अय्यरने अलीकडच्या काळात कर्णधार म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मुंबईच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेजेचे होते.