भादोले ( प्रतिनिधी ) भादोले ता. हातकणंगलेसाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुधारीत वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुर करावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत, त्याला मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर संचालक-गोकुळ दूध संघ, कोल्हापूर व जिल्हा परिषदचे मा.सभापती प्रवीण यादव यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवला.

यावेळी डॉ. सुजित मिणचेकर यांनी बोलताना म्हणाले भादोले गाव नदी काटापासून जवळ आहे पण पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाकडून 4 कोटी 96 इतका निधी मंजूर झाला पण या निधीत पाणी योजना पूर्ण होत नाही. सध्या गावातील जूनी पाण्याची टाकी पडण्याच्या अवस्थेत आहे, तर गावची जुनी पाईप लाईन असेल, शुद्ध पाण्यासाठी आवश्यक असणारा पाण्याचा फिल्टर हाउस बांधणे, तसेच गावची लोकसंख्या पाहता हा निधी अपुरा आहे.

यावेळी उपोषण स्थळी सरपंच स्नेहा पाटील ,उपसरपंच अलका पाटील, संगीता पाटील, मयूरी पाटील, सुवर्ण धनवडे, मालुताई कोळी, रूपाली कोळी, गीता अवघडे, दिलीप पाटील, धोंडीराम पाटील, राहुल पाटील, गणपती पाटील, सुनील काटकर, भगवान घोलप, तोफिक सनदे,अमोल कोळी, संजय पाटील, उल्हास पाटील, सूर्यकांत पाटील,रमेश कांबळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.