पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतला सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. या मतदार संघात नणंद-भावजंयची लढत झाली. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर आहे. यातच बारामतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नणंद-भावजंयची लढत झाल्यानंतर आता काका-पुतण्याची लढत होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार आज (11 जून) बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीमध्ये गोविंद बागेत आले असतं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटले आणि मागणी केली आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. आता एक दादा नको म्हटल्यावर दुसरा कोणता दादा असेल याची कल्पना तुमहाल आली असेल, तर दूसरा दादा हे युगेंद्र दादा आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. हाच पुतण्या अजित पवारांना आगामी विधानसभेत आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

युगेंद्र पवारांची राजकारणात एंट्री?
शर पवार आज बरांतीतील गोविंदबाग या निवासस्थानी आले असता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यात आली. मंगळवारी युगेंद्र पवार बारामतीत दौरा करत जनता दरबार घेतात. युगेंद्र पवार हे राजकारणात एंट्री घेणार का? तसंच शरद पवार त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकिट देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.