मुंबई – नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. महायुतीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली या यादीत नवनीत राणा यांना अमरावती मधून उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेश देखील केला. तर नवनीत राणा यांना महायुतीने उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे.

ठाकरे गटाचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते दिनेश बूब यांना अमरावती लोकसभेसाठी उभे केले आहे. आता अमरावती लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी देखील येत्या 2 तारखेला अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाच्या न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जिंकल्या तरी जनतेच्या न्यायालयात त्या हारणार आणि आम्ही जिंकणार तसेच अमरावतीच्या जनतेच्या मनात दिनेश बूब यांचेच नाव आहे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही काढणारी रॅली अमरावतीचे सर्व चित्रच पालटणारी असेल. तानाशाही जनतेला आवडत नाही त्यामुळे भाजपाने अशा प्रकारे उमेदवार देणेच चुकीचे आहे, हे RSS चं पण म्हणणं आहे असे बच्चू कडू म्हणाले .