मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेत. यातच परभणीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार यांची साथ सोडून आज शरद पवार गटात घरवापसी केली आहे. यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना, शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक नेते पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसलेच नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो.

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी यांनी घरपवसी केली. यावेळी दुर्राणी यांनी सूचक शब्दांत अजित पवार गटातील परिस्थितीबाबत दावे केले. यावेळी शायरीनं भाषणाची सुरुवात करताना दुर्राणी यांनी नाईलाजास्तव अजित पवार गटात गेल्याचं विधान केलं आहे
पक्ष प्रवेशानंतर बोलताना बाबाजाणी दुर्राणी यांनी “कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, वरना कोई यूँ बेवफा नहीं होता”, असं म्हणत त्यांनी शायरीने भाषणाला सुरुवात केली. “माझी अशी काही मजबुरी नव्हती. 1980 पासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे. चरख्यापासून घड्याळाच्या चिन्हापर्यंत मी त्यांच्याबरोबरच राहिलो. मराठवाड्यात तेव्हा फक्त तीन नगरपालिका होत्या. पाथरी, परतूर आणि उस्मानाबाद अशा तीन नगरपालिकांमध्ये आपले नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून मी शरद पवारांसोबत आहे”, असं दुर्राणी म्हणाले.

बाबाजानी दुर्रानी म्हणाले, 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे.

“काही कारणास्तव तिकडे गेलो”
“परभणीत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. पक्ष फुटल्याबरोबर मी शरद पवारांसोबतच राहिलो. पण दोन महिन्यांनंतर काही कारणास्तव काही लोकांच्या सांगण्यावरून तिकडे गेलो. मी एवढंच सांगेन की शरद पवारांना सोडून गेलेले अनेक लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले. ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालं मी शून्य होण्याआधीच आलो”, असं म्हणून दुर्राणी यांनी आणखी एक शेर म्हणून दाखवला.