मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सारखे स्टार फलंदाज फेल ठरले. भारतीय संघाने पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.
भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि त्याचे पीसीटी 60.71 आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका बसला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्याची PCT 57.29 आहे.
द. आफ्रिका मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्या दुसरी कसोटी सुरू आहे. जर यजमान संघाने सामना जिंकला तर ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतील.