टोप (प्रतिनिधी) : नागांव येथे राष्ट्रीय महामार्गालगत एका चारचाकी गाड्यांचे पार्किंग डेपो आहे. येथे काम करीत असणाऱ्या एका 60 वर्षीय वॉचमनने, प्यायला पाणी पाहिजे असा बहाना करत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मुलीने आरडाओरड करताच स्थानिकांनी सुहास शंकर गावसाणे (रा. वाणेगल्ली सुभाष चौक,वैराग जि सोलापूर) याला पोलीसांच्या स्वाधिन केले. शिरोली पोलिसानी त्याला पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावणावली.