मुंबई : ATM मधून पैसे काढण्यासाठी आता मध्य रेल्वे ने धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशांना ATM ची सोय केली आहे. प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. याचा फायदा प्रवाशांसोबतच रेल्वे महसूल ला देखील होणार आहे.

गैर-भाडे महसूल कल्पना योजना
रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केला होता. हा विचार नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून यातून दररोज सुमारे 2200 प्रवासी प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

योजनेचा प्रवाशांना लाभ
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार केला गेला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ह्या सेवेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.

व्यवहार करणे झाले सोपे.
ही योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवली जात आहे. या सेवेचा लाभ महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना होणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही योग्य वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.