कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरातून हजारो भाविक सौंदत्ती यात्रेसाठी जातात. सौंदत्ती यात्रा 11 ते17 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सौंदत्ती यात्रेसाठी यंदा तब्बल 160 एसटी बसेसचे बुकिंग झाले आहे. गतवर्षी हा आकडा 129 होता.
यंदा संभाजीनगर आगारातून 150 एसटी बसेसचे बुकिंग झाले आहे. उर्वरित 10 गाड्यांचे बुकिंग जिल्ह्यातील आगारातून झाले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली. सौंदत्ती यात्रा 11 ते 17 डिसेंबरदरम्यान आहे. सर्व एसटी बसेस किरकोळ दुरुस्तीची कामे करून घेऊन प्रत्येक गाडीवर रेणुका देवीचे स्टिकर लावली आहेत. सांगली, सातारा आगारातूनदेखील गाड्या मागविल्या आहेत. इचलकरंजी, गारगोटी, गडहिंग्लज, मलकापूर, चंदगड, कुरूंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा आगारातून गाड्या सोडल्या जाणार आहेत. फेऱ्यांचे नियोजन विभागीय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.