मुंबई ( प्रतिनिधी ) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याला जखमदेखील झाली. या सर्व प्रकाराने देशभरात खळबळ उडाली आहे.
अभिनेता सैफ अली खानचे प्रकरण ताजे असताना अभिनेता शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात हा व्यक्ति अपयशी ठरल्याचेही सांगितलं जातं आहे.
मन्नत बंगल्यातील कुंपन भिंतीवर असलेल्या जाळीमुळे शाहरुखच्या घरात घुसण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मात्र घरात घुसखोरी कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसणारा व्यक्ति एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.