शिरोळ (प्रतिनिधी) : ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत यड्राव येथील वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तात्यासाहेब दानोळे (वय ५७) असे त्यांचे नाव असून हा अपघात आज (मंगळवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास इचलकरंजीतील सांगली नाका ते टाकवडे रस्त्यावरील मैलखड्ड्याजवळ घडला.

उपचारासाठी त्यांना इचलकरंजी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यड्राव येथील शामराव पाटील पतसंस्थेचे ते संचालक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.  या घटनेची नोंद इचलकरंजी गावभाग पोलिसांत झाली आहे.