कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील दुकानदारांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकांनाही ओळखपत्र आणि गणवेश सक्तीचा असून, मंदिरातील सर्वच घटकांनी भाविकांनी सौजन्याने वागावे, अशा सूचना नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी समिती बैठकीमध्ये दिल्या आहेत.

बैठकीत या सूचना देण्यात आल्या..?


बैठकीस समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सहायक सचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांची उपस्थिती होती. मंदिर परिसरातील दुकानात पेठे आणि प्रसादाचे साहित्य हे भेसळमुक्त असायला हवे. आपापले विद्युत जोडणी प्रमाणपत्र घ्यावे. दुकानातील कामगारांसाठीही ओळखत्रे द्यावीत. कामगारांच्या नावाची यादी देवस्थान समितीकडे जमा करावी. प्रत्येक दुकानातील अग्निरोधक यंत्रणा सुसज्ज असायला हवी अशाही सूचना यावेळेस या बैठकीत देण्यात आल्या.