दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर री एनडीएचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खातं देण्यात आलं आहे.

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर खात्यांची विभागणी करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 25 भाजपाचे आणि 5 मंत्रीपदे मित्रपक्षांचे आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणता विभाग कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला आला आहे ते जाणून घेऊया…

1) नितीन गडकरी – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री (कॅबिनेट), अजय टमटा – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री (राज्यमंत्री), हर्ष मल्होत्रा – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री (राज्यमंत्री) 2) अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री, 3) एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री, 4) राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री, 5) निर्मला सीतारमण – अर्थमंत्री, 6) मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि नगरविकास आणि ऊर्जामंत्री, राज्यमंत्री – श्रीपाद नाईक.

7) जितन राम मांजी – लघु, मध्यम, सूक्ष्म मंत्रालय (कॅबिनेट), 8) शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत, ग्रामविकास मंत्रालय, 9) पियूष गोयल – कॉर्पोरेट मंत्रायल, 10) मनसुख मंडविया – कामगार आणि क्रिडा मंत्री (कॅबिनेट), 11) राम मोहन नायडू – हवाई वाहतूक (कॅबिनेट), 12) किरेन रिजिजू – संसदाय कामकाज, 13) गजेंद्र सिंह शेखावत – सांस्कृतिक आणि पर्यटन, 14) भूपेन्द्र यादव – पर्यावरण, 15) हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम, 16) चिराग पासवान – क्रिडामंत्री, 17) जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्री, असे खातेवाटप झाले आहे.