कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा अशा राज्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. प्रामुख्याने शेती करणारे शेतकरी हे काळानुसार आधुनिक शेती करत आहेत. आधुनिकीकरणाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये खूप प्रगती केलेली आपल्याला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक श्रीमंत शेतकरी कोणत्या राज्यात कोणत्या गावात राहतात हे माहित आहे का तुम्हाला..? चला तर जाणून घेऊयात…

पूर्वीचे अहमदनगर आणि आत्ताचे अहिल्यानगर या जिल्ह्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर ‘हिरवे बाजार’ हे गाव आहे. या गावात राहतात सर्वांधिक श्रीमंत शेतकरी. तब्बल 60 करोडपती लोक राहतात. हे सर्व भारतातील श्रीमंत शेतकरी आहेत. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. या गावची लोकसंख्या 1200 इतकी आहे. गावचे प्रमुख मानले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे या गावाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला आहे.

‘या’ कारणांमुळेच हिरवे बाजार गाव आर्थिकदृष्ट्या सधन…

हिरवे बाजार या गावात शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे येथील शेतकरी नेहमीच शेतीत विविध प्रयोग करत असतात. आधुनिक शेतीच्या जोरावर या गावाने मोठी आर्थिक भरभराट केली आहे. 50 कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

या गावात कापूस, सोयाबीन, ऊस इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात पेरली जातात. याशिवाय, काही लोक दुग्धव्यवसाय आणि छोटे उद्योगधंदे करून आपले जीवनमान उंचावतात. त्याचबरोबर, या गावातील हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळा उष्ण आणि शुष्क तर हिवाळा थंड असतो. मोसमी पावसाच्या आधारे येथे शेती केली जाते.