मुंबई (प्रतिनिधी ) : अक्षय कुमार पुन्हा एकदा ॲक्शन आणि बायोपिकनंतर पुन्हा एकदा कॉमेडी आणि हॉररच्या जगात प्रवेश करत आहे. तो भूत बंगला या चित्रपटातून कॉमेडी चित्रपटसृष्टीत परतत आहे. या चित्रपटाला हॉरर आणि कॉमेडीचा टच आहे.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट भूत बंगला या वर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. हा चित्रपट कॉमेडी आणि हॉरर प्रकारातील आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहे. आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर अली आहे. अक्षयने प्रियदर्शनसोबत भूल भुलैया आणि गरम मसाला सारखे कॉमेडी चित्रपट केले आहेत. आता तो पुन्हा प्रियदर्शनसोबत काम करताना दिसणार आहे.

कधी होणार प्रदर्शित..?

अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी सांगितले आहे. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज आम्ही आमच्या हॉरर कॉमेडी भूत बंगला चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहोत, त्यामुळे मी माझ्या आवडत्या प्रियदर्शनसोबत सेटवर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. भीती आणि हास्याचा हा डबल डोस असेल. तुमच्यासाठी 2 एप्रिल 2026 रोजी तयार होईल. तोपर्यंत आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.’ असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.