आजरा (प्रतिनिधी ) गेले महिनाभर आजरा तालुक्यात ठाण मांडून असलेला हत्ती आज तालुक्यातील वाटंगीत पुन्हा धुडगूस घातला. आज (गुरुवार) पहाटे हत्तीने धुमाकूळ घालत विष्णू गिलबिले यांच्या शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी, पाण्याची टाकी, काजू व नारळाची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले आहे.
तर या हत्तीने पेद्रेवाडी, हाजगोळी, यमेकोंड परिसरामध्ये नुकसान सत्र सुरूच ठेवले आहे. आज पहाटे तर हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घालत शेती औजरांचे मोठे नुकसान केले. मात्र, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपली व्यथा कोणासमोर मांडायची असा प्रश्न पडला आहे.
तर वनविभागाकडून हत्ती हटवण्याची मोहीम राबवली जात असली तरी यामध्ये फारसे यश येत नाही. गेले तीन ते चार महिने पूर्व भागात हा हत्ती तळ ठोकून आहे. या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार तरी कधी ? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.