मुंबई : सोने – चांदी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाला निमित्त लागत नसते. तर आता ऐन लग्नसराईमध्ये सोने -चांदी खरेदी केले जाते. तर ऐन लग्नसराईमध्ये सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारा बरोबरच सराफ बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज सोमवारी 16 डिसेंबर रोजी वायदे बाजारात दोन्ही धातुच्या किंमतीत घट झाल्याचे समोर आले आहे. आज 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 1,400 रुपयांनी घसरून 79,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली होती. 99.5 टक्के शुद्धता असलेले सोन्याचा दरदेखील 1,400 रुपयांनी कमी होऊन 79,100 रुपयांवर स्थिरावलेला आहे. मागील सत्रात याचा दर 80,500 रुपये प्रति तोळा होता. चांदीमध्ये या दरम्यान 68 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं चांदी 90,933 रुपयांवर स्थिरावली आहे. तर मागील चांदी दर 91,001 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने शुक्रवारी 35 डॉलरने घसरले तर चांदी 31 डॉलरच्या जवळपास स्थिरावलेली आहे.