कोल्हापूर ( प्रतिनिधी ): शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो मार्गदर्शक असतो पण लातूर येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळा येथील नराधम शिक्षकाने गुरु या शब्दाला काळीमा फासत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. यामध्ये अरविंद खोपे वाय 13 इयता 7 वी मध्ये शिकणारा निष्पाप युवक दिनांक 29 रोजी अरविंद च्या गरीब कुटुंबातील आई वडिलांना शाळेतून फोन आला कि अरविंद च्या पोटाला लागले आहे, आणि रक्त येत आहे. आश्रम शाळेत पालकांनी नातेवाईकांना पाठवलं तर तिथे सांगण्यात आल कि अरविंद पळून गेला आहे. त्याची शोधाशोध सुरु असताना आश्रम मधील बाथरूम मध्ये त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. दिनांक 30 जुलै 2024 रोजी त्याचा मृतदेह एक शिक्षक लपवन्याचा प्रयत्न करत जंगलात नेत असताना.अरविंद च्या नातेवाइकांनी त्या शिक्षकाला रंगेहात पकडले. त्या वेळी तो शिक्षक तिथून पळून गेला. ज्यांना गुरु मानले त्यांनीच त्याचा घात केला.
सदर प्रकरणात महाराष्ट्रातील सर्व संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक सेवक यांनी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयन्त करावेत. व आरोपीना शिक्षा द्यावी. यासाठी आज युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध केला. यावेळी आरोपी शिक्षकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर समन्व्यक बंडा लोंढे, शहर अधिकारी संतोष कांदेकर, जिल्हा चिटणीस युवराज मोरे, समन्व्यक चैत्यन्य देशपांडे, उपशहर युवा अधिकारी रोहित वेढे, अजय कांबळे, अक्षय चौगुले, रोहित पाथरूथ, गणेश सोनावणे, यश लोंढे, ओंकार लोंढे, सोहम कांबळे, साहिल हकीम, योगेश चौगुले आदी उपस्थित होते.