मुंबई – ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना, ‘रवी राजा यांच्यनंतर काँग्रेस मधील अनेक बडे नेते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे आणि निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार स्थापन होणार’ असे संकेत फडणवीसांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्यासोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. भाजपला त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
रवी राजांनी फडणवीसांचा केला ‘असा’ उल्लेख…
विधानसभा निवडणुकीमुळे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, याची सतत चर्चा सुरु आहे. रवी राजा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री, असा केला, त्यांनी केलेला हा उल्लेख अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.