मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीने अख्ख्या देशाला 2019 मध्ये हादरून सोडलं होतं. कोरोना महामारीमुळे कोणी कोणाच्या संपर्कातच येत नव्हतं. सगळीकडे कडक लॉकडाऊन होता. कोरोनामुळे आपल्या कुटुंबियांच्या अंत्यसंस्कारादेखील जाता येत नव्हतं. कोरोना महामारीनंतर आता देशात नवीन विषाणू पसरण्याचा धोका आहे. कोरोनाप्रमाणेच हा विषाणू वटवाघूळांमुळे झाल्याचा संशय आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 90 टक्के रूग्णांसाठी ते घातक आहे. जगात आतापर्यंत 8 रूग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

वटवाघूळांमुळे पसरणाऱ्या विषाणूचे नाव आणि त्यांचे परिणाम…


वटवाघूळांमुळे पसरणाऱ्या विषाणूचे नाव मारबर्ग आहे. यामुळे रुग्णांना तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, उलटी, अतिसार, आणि रक्तस्त्राव या समस्यांचा सामना करावा लागतो. मारबर्ग विषाणू असलेल्या रुग्णांमध्ये जुलाब, पोटात ढेकूळ जाणवणे, उलट्या होणे आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. त्याचबरोबर, आफ्रिकन देशातून भारतात येणाऱ्या लोकांमुळे येथे हा विषाणू पसरण्याचा धोका आहे. याशिवाय संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 160 लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.


सध्या, मारबर्ग विषाणू रवांडा, पूर्व आफ्रिकेत पसरला आहे. येथील परिस्थिती पाहून WHO ने आफ्रिकन देशांमध्ये त्याच्या धोक्याबाबत अलर्ट जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे.


WHO च्या अहवालानुसार, हा संसर्ग रवांडाच्या 30 जिल्ह्यांमध्ये पसरला असून 26 पैकी 20 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आफ्रिकन देशांतून भारतात येणा-या लोकांपासून येथे हा विषाणू पसरण्याचा धोका आहे. सध्या रवांडामधील रूग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 160 लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.