मुंबई (प्रतिनिधी) : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ रिलीज होऊन 9 दिवस झाले आहेत. तर ‘पुष्पा 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज झालेल्या पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

चित्रपट आणि त्यातील अभिनेता अल्लू अर्जुन वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अनेकदा चर्चेत आला आहे. काल त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. आता त्याची सुटका करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर दिसून येत असून, निर्मात्यांना या सगळ्याचा मोठा नफा होत असल्याचे दिसत आहे. पुष्पा 2 चे नवीन कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने काल 36.3 कोटी रुपये कमवले आहेत.