मुंबई – सध्या ऑनलाईन विश्वात शिक्षण ,करियर असो किंवा मग व्यवसाय असो यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच एआय ने धूमाकूळ घातला आहे. एआय म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील जणू अविभाज्य घटकच बनलेला आपल्याला पहायला मिळत आहे. आता एआय च्या पुढचा ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ येत आहे.

एजीआय म्हणजे नेमकं काय ..?


‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (AGI) म्हणजेच एक अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी मानवी बुद्धिमत्तेच्या पातळीवर कार्य करू शकते. एजीआय साधारणपणे कोणत्याही कार्यात, जसे की समस्या सोडवणे, शिकणे, आणि विचार करणे, मानसाप्रमाणेच काम करू शकते.एजीआय कडे विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. जसे की भाषा, गणित, विज्ञान, कला.

एजीआय त्यांना ट्रेनिंगसाठी दिलेल्या डेटावरच अवलंबून असणार नाही तर, ते एखाद्या माणसाप्रमाणेच नव्या गोष्टी शिकून घेऊन त्यावरती देखील काम करणार आहे. यामधील एजीआय विकासासंबंधी असलेल्या विचारधारा आणि तंत्रज्ञानाबद्दल अनेक चर्चा होत आहेत.