निपाणी ( प्रतिनिधी ) – युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार साहेब पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन सीमा भागातील आप्पाचीवाडी ग्रामस्थांना जवळच्या महाराष्ट्र राज्यातून आरोग्य, शिक्षण ,पोलीस भरती वनविभाग भरती यासह अन्य सुविधांसाठी आप्पाचीवाडी गावाचे 865 जीआर मध्ये नोंद करावी, व सीमा भागातील सर्व योजनांचा लाभ आप्पाचीवाडी ग्रामस्थांना मिळावा यासाठीचे निवेदन आज मुंबई येथे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांना युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्र्यांसोबत व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, पै.रमेश खोत ,राजाराम हेलाटे उपस्थित होते.