कपिलेश्वर ( प्रतिनिधी ) : मेघालय राज्याचे ‘राज्यपाल सी एच विजय शंकर’ हे 15 सप्टेंबर रविवार या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथून महालक्ष्मी दर्शनासाठी रवाना होतील. महालक्ष्मी दर्शनानंतर सकाळी 08:15 ते 08:30 श्रीक्षेत्र आदमापुर येथील बाळूमामा दर्शनासाठी रवाना होतील 09:45 ते 10:00 आदमापूर बाळूमामा समाधी दर्शनानंतर नियोजित पुढील दौऱ्यासाठी कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील.
राज्यपाल सी एच विजय शंकर याप्रमाणे रविवारी दौरा निश्चित असून रविवारी भाविक आदमापुर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी राज्यसह कर्नाटक राज्यातील दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 8 ते11 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार असल्याची नोंद घेऊन भाविकांनी सहकार्य करावे असे प्रसिद्धीस बाळूमामा देवळाच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके दिले आहेत.
.