मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली आहे. तिला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल केलं आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना जान्हवीने विमानतळावर काहीतरी खाल्लं ज्यातून तिला विषबाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळावरुन घरी आल्यानंतर जान्हवीची प्रकृती खालावली होती आणि बुधवारी तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. जान्हवीची तब्येत बिघडल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने तिला बुधवारी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल केलं आहे. जान्हवीची प्रकृती सध्या ठीक आहे. तिला शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सशी जोडले जात आहे. लवकरच ती साऊथ आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे