मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने मोठी घोषणा केली आहे. विक्रांतने इन्स्टाग्राम पोस्ट करत त्याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या निर्णयाने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कारकिर्दीच्या शिखरावर असताना विक्रांतने हा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रांत मेस्सीने आत्तापर्यंत उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुकही करण्यात आले होते. काल 1 डिसेंबर रोजी विक्रांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नमस्कार, गेले काही वर्ष आणि येणारे वर्ष खूप चांगले जाणार आहेत. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
मात्र, मी जसा जसा पुढे जातोय तशी मला जाणीव होतेय की आता रिकेलिब्रेट करण्याचा आणि घरी जाण्याची वेळ आली आहे. एक पती, पिता आणि मुलाच्या रुपाने आणि एक अभिनेता म्हणूनही, असं विक्रांतने म्हटलं आहे. येणाऱ्या 2025 या वर्षात आपण शेवटचे एकमेकांना भेटणार आहोत. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. मागील दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. या दरम्यान प्रत्येक गोष्टीसाठी मी सदैव ऋणी आहे, असं विक्रांतने म्हटलं आहे.