बेंगळूर : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळूर येथील पबवर कारवाई करण्यात आली आहे. बेंगलूरमधील वन 8 कम्युन असं कोहलीच्या मालकीच्या पबचं नाव आहे. रात्री एक वाजल्यानंतर देखील हा पब सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पबच्या मॅनेजरवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बेंगळूर, एमजी रोड येथील विराट कोहलीच्या मालकीच्या वन 8 कम्युन पब विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गेल्याच वर्षी विराट कोहली याच्याकडून हा पब खरेदी करण्यात आला होता. 6 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटापर्यंत हा पब सुरु होता त्यामुळे ह्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. बेंगळूरमधील 4 ते 5 पबवर अशी कारवाई करण्यात आली आहे.
डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पहाटे दीड वाजेपर्यंत चालू ठेवलेल्या सुमारे 4-5 पबवर कारवाई केली. तसेच रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त काळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित वन 8 कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. 6 जुलै रोजी, वन 8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब नेहमीच्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.