मुंबई : बॉलिवूडमध्ये आमिर खान हा आघाडीचा कलाकार आहे. आमिर खान आपल्या आगामी चित्रपटाची माहिती देखील सोशल मीडियाला देत असतो. आमिर खानचे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले गेले आहेत. त्यापैकी आमिर खानचा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आहे. तर आमिर खानच्या आगामी सीतारे जमीन पर या चित्रपटाबाबत चर्चा रंगलेली दिसत आहे.

आमिर खानने सांगितले की, तो स्वत: त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे. तारे जमीन पर चित्रपटाचा सिक्वेल पुढील वर्षाच्या मध्यात चित्रपटगृहात येऊ शकतो, असे आमिर खानने सांगितले आहे. हा चित्रपट 2007 साली आला होता. या चित्रपटाबद्दल आमिर खान म्हणाला की, हा चित्रपट नवीन कथा, नवीन पात्र आणि पूर्णपणे नवीन परिस्थितीवर आधारित आहे. हे ऐकून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

हा चित्रपट याआधी डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता त्याची रिलीज डेट 2025 च्या मध्यावर घेण्यात आली आहे. ‘सीतारे जमीन पर’ व्यतिरिक्त आमिरने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दलही सांगितले आहे. तसेच अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सीतारे जमीन पर या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसूजा देखील असणार आहे. याशिवाय त्याचा ‘हॅपी पटेल’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये वीर दास, इम्रान खान आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.