आजरा (प्रतिनिधी ) : आजरा तालुक्यातील निंगुडगे येथे विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या वारकरी महिला इंदुबाई भिकाजी परीट (वय 70) यांचा वारीवरून परत येत असताना रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. 31 रोजी गावातील वारकरी मंडळी कार्तिक वारीला क्रूझर वाहनाने पंढरपूर येथे गेले होते. रविवारी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सोमवारी गावी परत येत असताना सोलापुर जवळ फळे खरेदीसाठी आणि चहापाणी घेण्यासाठी गाडी थांबली होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या. दवाखान्यात नेल्यावर उपचारपूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी निंगुडगे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्यात पती, मुलगा, विवाहित दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने निंगुडगे गावात शोककळा पसरली आहे.
