कोल्हापूर (प्रतिनिधी) : रायगड कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने आज (बुधवार) थुंकीमुक्त अभियान राबविण्यात आले. भागातील नागरिकांनी प्रबोधनपर रॅलीचे आयोजन करून कोल्हापूर थुंकीमुक्त करण्याची शपथ घेतली.
‘थुंकीमुक्त कोल्हापूर’ हे आपले स्वप्न असून कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहोचणे हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे. अशाच प्रकाराची चळवळ अन्य उपनगरांत राबविण्याचा निर्धार थुंकीमुक्त चळवळीचे प्रणेते आणि कार्यक्रमाचे आयोजक राहुल चौधरी यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. चैताली चौगले यांनी थुंकीमुक्त परिसराचे महत्त्व विशद केले. या अभियानात संपदा मुळेकर, लखन काझी, निवास भोसले, बाळासाहेब देसाई, चंद्रकांत कांडेकरी, संजय पोवार, गीतांजली डोंबे, नीता पडळकर, रसिका गोळे, सिद्धू जाधव, भरत तोडकर, रवी इनामदार, नागेश लाळगे, संदीप परीट, अमोल गुरव सहभागी झाले होते.