हुपरी (प्रतिनिधी) : महायुतीची उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी हुपरी येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान केली. येथील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई-मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करीत सोबत असल्याची ग्वाही दिली.

यावेळी चांदी असोसिएशन्स येथे खासदार धैर्यशील माने यांनी संवाद साधत पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी मराठा समाजाचे सदस्य व नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे हिंदूवादी कार्यकर्ते व सोन्या-चांदीचे व्यापारी शिवाजी शेटके (आबा) यांच्या शोरूमलाही भेट दिली. तसेच अरुण गायकवाड यांच्या घरी भेट दिली असता यावेळी प्रवीण गायकवाड, शाहू गायकवाड निळकंठराव गायकवाड, नारायण घोरपडे, धनाजीराव भोसले यांनी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

यानंतर अंबाबाई मंदिर येथे मनसेचे नगरसेवक आणि तालुकाध्यक्ष दौलत पाटील (आण्णा) यांच्या घरीही भेट दिली. यावेळी गणेश मालवेकर, पद्माकर चौगुले, सुहास यादव, रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे जल्लोषात स्वागत केले.

वडगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन देवाप्पाण्णा मुधाळे यांनी आदरातिथ्य करत प्रचारांमध्ये आघाडी घेण्यासंदर्भात आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच, भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कागले यांच्या घरी भेट दिली. ज्येष्ठ उद्योजक आप्पासाहेब निकम, नगरसेवक सजंय निकम, मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस यांच्या घरी सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते व त्यांच्याशी संवाद साधला.

आठवले गटाचे राज्य सचिव मंगलराव माळगे, जयकुमार माळगे यांच्या घरी भेट देत त्यांना प्रचारामध्ये आघाडी घेण्यासंदर्भात सांगण्यात आले. प्रवीण चौगुले यांनी सुनील साळुंखे यांच्या मंडळातील कार्यकर्ते यांचीही भेट घेतली शंकरराव पाटील यांच्या घरी आणि गावातील प्रतिष्ठित उद्योजक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेट्टी, निरंजन शेटे यांच्या घरी ही खासदार धैर्यशील माने यांनी भेट दिली.

युवा उद्योजक व युवा नेतृत्व निशांतराव पोळ यांच्या घरी त्यांच्यातील सर्व नातेवाईक व कार्यक्रते संबंधितांना प्रचारामध्ये सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केले. यावेळी खासदार माने यांच्या समवेत तालुकाध्यक्ष अजितराव सुतार जेष्ठ नेते महावीर गाठ, तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, शहर प्रमुख नितीन गायकवाड उपस्थित होते.

तसेच भाजपा शहरप्रमुख सुभाष कागले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव वाईगंडे, मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस, दिनकर ससे, नेताजीराव निकम, शिवाजी शेटके, रोहित शेटे, अरुण गायकवाड, धनाजीराव भोसले, नारायण घोरपडे, प्रवीण गायकवाड, मनसे पदाधिकारी पद्माकर चौगुले सुहास यादव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे जयकुमार माळगे निशांत पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याचबरोबरच पट्टणकोडोली, रेंदाळ, यळगुड, रांगोळी, जंगमवाडी गावात भेटी देऊन शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीच्या प्रमुख मान्यवरांच्या घरी खासदार माने यांनी भेटी दिल्या.