कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील वायल्डर मेमोरियल चर्च येथे कोल्हापूर चर्च कौन्सिल संचलित शिष्यत्व प्रमाणपत्र सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम ( डी सी एल पी ) हा कार्यक्रम झाला. यावेळी विविध गीते व नृत्य याद्वारे देवाचे गुणगान करण्यात आले. डी सी एल पी च्या अध्यक्षा स्नेहलता थोरात, अलिशबा चौगुले, शैला आढाव, सरला वांद्रे, जयंती रुकडीकर, आशा समुद्रे उषा मनपालेकर,कविता गायकवाड, मेघा आवळे, नीलम समुद्रे, माया मनपाडळेकर तसेच सिद्धार्थ नगर व कनान नगर शाखेतर्फे गीते व नाटिका सादर केली. यामध्ये सारिका कांबळे, आशादेवी सरनाईक, रंजना मोरे, व सतीश कांबळे यांचा सहभाग होता.

विक्रमनगर चर्च शाखा यांचे मार्फत कुष्ठरोगी, गरीब, व अनाथ लोकांना मदत करणे हे देवाला दिल्याप्रमाणे आहे अशी बायबल ची शिकवण आहे असा संदेश नाटिकेतुन दिला. याचे पुढारीपण कुसुम चौगुले, शशिकला कदम, वैशाली फर्नांडिस यांनी केले.

इम्यानुएल सी ई यांच्या तर्फे रेव्ह. आनंद जाधव यांनी साधू सुंदरसिंग यांचे जीवनावर आधारित नाटिका सादर केली. यामध्ये कु. सिमरन कुरणे, शक्ती मनपाडळेकर, अभिलेखा समुद्रे, जोयेल पठाण, सोहन कुरणे, अजिंक्य चरणकर, लाजारस काळे, जॉयसी समुद्रे यांनी सहभाग घेतला. याचे सूत्रसंचालन स्तुती आनंद जाधव यांनी अत्यंत प्रभाविपणे केले.