आजरा ( प्रतिनिधी ) : कानोली (ता. आजरा ) येथील सरंबळवाडी जवळील गायरान हद्दीत पडीक जमिनीवर युवकांच्या पुढाकाकाने मैदान तयार करण्याचे नियोजन झाले आणि बघता -बघता युवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गेले तीन दिवस मैदान सपाटीकरण काम जोरात सुरु आहे. युवक आणि लोकांनी ठरविले तर अश्यक असे कामही लोकवर्गणीतुन होऊ शकते याचे उदाहरण म्हणून याकडे पहावे लागेल, कामाला मुहूर्त मिळाला तो लक्ष्मी -देवी यात्रेच्या निमित्ताने. कांही हौशी युवक यांनी यात्रा काळात क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे नियोजन केले, नियोजन झाले.

मात्र स्पर्धा भरविण्यासाठी मैदान कुठे. असा प्रश्न उभा राहिला. मग हौसेला मोल नाही. ग्रा. प. हद्दीत रिकामे गायरान सरंबळवाडी फाट्यावर मैदान करण्याचे ठरले. मग आणि प्रश्न उभा राहिला मैदान करण्यासाठी पैशाचा. मग चर्चा सुरु झाली. आणि KPL यात्रेनिमित्त हा सोशल मीडिया ग्रुप तयार झाला, यामध्ये क्रिकेट शौकीन किरण देसाई यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतुन मैदान तयार करण्याची संकल्पना मांडली त्याला युवक आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आणि बघता बघता ₹20000/- जमा झाले. मात्र एवढ्या रक्कमेत मैदान तयार होणे शक्य न्हवते मग अहवान करण्यात आले आणि निधी जमा होण्यास सुरवात झाली. किमान 50000₹ अपेक्षित खर्च निधी आहे. अजूनही निधीची आवश्यकता आहे.. मात्र थांबून चालणार नाही म्हणत मैदानाचे काम सुरु झाले. शनिवार दि. 15 रोजी गावच्या सरपंच सुषमा पाटील आणि प्रमुख यांच्या उपस्थितीत मैदान कामाचा शुभारंभ झाला.

यावेळी. ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, संभाजी आपगे, राजू पाटील सुभाष पाटील किरण देसाई, विनायक सावरतकर,अभिजित देसाई प्रविण पाटील, गुरूदास पाटील, दिग्विजय भोसले,प्रणव पाटील, वैभव पाटील,विरेंद्र पाटील प्रथमेश देसाई. महेश गंधवाले, आदित्य देसाई प्रथमेश पाटील, ज्योतीरा दित्य पाटील, प्रतीक पाटील गिरीश भोगण,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरंबळवाडीचे मा. उपसरपंच बाजीराव देवरकर यांनी तर ₹10000/- ची देणगी देऊन युवकांना प्रोत्साहित केले. मुबई-पुणे व स्थानिक वाहनधारक यांनी मदत करून सहकार्य केले. युवकांनी केलेले कार्य नक्कीच समाजाला दिशा देणारे आहे..