टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे जैन मंदिरासह अन्य चार ठिकाणी धाडसी चोरी झाली असून यामध्ये 7 ते 8 लाखांचा मुददेमाल लंपास करण्यात आला. मंदिर कार्यालयातील कपाटातील चांदीचे दागिने ठेवून साडेपाच लाखाची रोकड नेली. 5 ते 6 जणांच्या टोळी सिसिटिव्ही काॅमेरात कैद, चोरीची सुरुवात मध्यरात्री 1 :30 ते 4 वाजण्याच्या वेळेत , या 5 ठिकाणी झालेल्या चोरी एकाच टोळीने केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागाव फाटा येथील मल्लिकार्जुन कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या सुरेश पांडुरंग गिरी यांच्या बंद घराचे कडी कोयंडा उचकटुन रात्री 1 :30 च्या सुमारास घरात प्रवेश करून घरातील साहीत्य विस्कटुन कपाटातील 40 हजार किंमतीचे सोन्याचे मनी आणि रोख 15 हजार नेले. गिरी यांचे मुळगाव कर्नाटकातील रासाई शेंडूर असून प्रत्येक शूक्रवारी गावाकडे शेती करण्यासाठी जातात. यावेळी ते गेले असताना हि चोरी घडली.

त्यानंतर चोरट्यांनी शिरोली येथील यादववाडी येथील मेनन काॅलणीतील 2 बंद घराचे कडी कोयंडा उचकटुन घरातील साहीत्य विस्कटुन मुद्देमाल शोधण्याचा प्रयत्न केला पण 1 हजार व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. हातात तुटपुंजी मुद्देमाल हाती लागल्याने नैराश्यात चोरट्यांनी मोठ्या मुद्देमालाल्या शोधात त्यांनी सांगली फाटा येथील जैन मंदिर आणि पारस मेटल फोडण्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

मंदिराचे कार्यालय फोडून कार्यालयातील तिजोरी कटावणीच्या सहाय्याने उचकटुन तिजोरीत सुमारे साडेपाच लाख रुपये चोरट्यांच्या हाती लागले. पण चोरट्यानी अंदाजे 2 किलो चांदी न नेता फक्त मोठी रक्कमच लांबली. याच मंदिराच्या शेजारीच असणारे एक भांडी दुकान फोडले येथेही चोरट्यांनी लाखाच्या रक्कमेवर डल्ला मारला. 5 ते 6 जणांच्या या टोळीने मंदिर परिसरात चोरी करताना 20 ते 25 किलोचा घडीव दगड कार्यालयात चोरट्यानी कशासाठी कोणत्या कारणासाठी आणला असावा किंवा चोरीत अडसर ठरणाऱ्याचा घातपात करून चोरीचा उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न तर नसावा असे अंदाज परिसरातून आणि पोलिसांकडून व्यक्त होत आहेत.

मंदीर परिसरात वॉचमन आणि सिसीटिव्ही कॅमेरे असून देखील चोरटे कोणाच्याच नजरेत आले नाहीत कारण मंदीर कार्यालयाच्या समोरच वॉचमन होता. तो ही वयोवृद्ध आणि कार्यालयाच्या समोर आणि साईटला असणारा सिसिटिव्ही कॅमेरा एक भिंती आड तर दुसऱ्या कॅमेरावर कापड असल्याने चोरटे कोणाच्याच नजरेत आहे नाहीत. पण मंदिरामागील बाजूस असणाऱ्या एका दुकानाच्या काॅमेरात आले आहेत पण ते ही अंधुक दिसत असल्याने त्यांचे चेहरे दिसत नाहीत पण त्यांच्या हालचाली दिसतात. या चोरीचा छडा लावण्यासाठी विषेश पथकाच्या मार्फत तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.