कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : क्वीअर आणि अॅल्लिस आर्ट्स फेस्टिव्हल हा विविधता, समावेश आणि सर्जनशीलतेचा उत्सव, मिस्ट एलजीबीटीक्यू फौंडेशनच्या पुढाकाराने कोल्हापुरात यशस्वीपणे संपन्न झाला. हा कार्यक्रम एलजीबीटीक्यूआयऐ+ हक्क, आरोग्य आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समानतेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. स्टेशन रोडवरील 3 व्हीज् हॉटेलच्या सहागृहात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्याम कोन्नूर (संस्थापक, मिस्ट एलजीबीटीक्यू फौंडेशन) म्हणाले, “कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला खूप आनंद होतो आहे. या शहरात पहिल्यांदाच व्यासपीठ सादर केल्याचा आनंद आम्हाला मिळाला. ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे.” असे मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीराम श्रीधर, व्यवस्थापकीय संचालक, मिस्ट एलजीबीटीक्यू फौंडेशन आणि प्रकल्प व्यवस्थापक आणि मिस्ट एलजीबीटीक्यू फौंडेशनचे व्यवस्थापक, सूरज राऊत यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
स्थानिक समन्वयक अभिमान समुहाचे विशाल पिंजाणी म्हणाले की, ‘क्वीअर अॅन्ड अॅल्लिस आर्ट्स फेस्टिव्हल हा विविधता आणि समावेशाचा उत्सव होता, ज्याने कोल्हापूरकरांना कला आणि समुदायाच्या ताकदीचा अनुभव दिला. एलजीबीटीक्यूआयअऐ+ हक्क आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच तो समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारा क्षण ठरला. या ऐतिहासिक कार्यक्रमाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला नवीन आयाम दिला. भविष्यात त्याची व्यापकता वाढवण्याचा असा निर्धार व्यक्त केला. भरतनाट्यम आधारित गणेश वंदनेसह विविध नृत्य गीतांनी या कार्यक्रमाचा समरोप केला.