हातकणंगले ( प्रतिनिधी ) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आळते तालुका हातकणंगले गावात बंडखोर सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. मातोश्री ब्लड बँक चिक्कोडीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले.

या शिबिरात 43 जणांनी रक्तदान केले. बंडखोर सेनेचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष विनोद हेगडे आणि सोमनाथ पांडव यांच्या प्रमुख संयोजनाखाली हे शिबिर झाले. मातोश्री ब्लड बँकेच्या वतीने बँकेचे प्रमुख मालक अक्षय मुगुळकुड, डॉ. प्रतिक पाटील आणि अन्य परिचारिका कर्मचारी यांनी काम केले. ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

यावेळी शिरीष थोरात, राम कांबळे, संदीप कोठावळे, प्रभुद्ध कुरणे, अमोल पांडव, विशाल हेगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, बंडखोर सेना हातकणंगले तालुका उपाध्यक्ष आणि सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समानतेची आणि मानवतेची शिकवण बंडखोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृतीत उतरून दाखविला आहे. अशी भावना व्यक्त केली.