मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलने खेळवायला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने हे पाकिस्तान आणि दुबई येथे सुद्धा खेळवले जातील. यासाठी बीसीसीआय  आणि पीसीबी यांच्यात सामंजस्य झाले आहे. तर भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जातील. तर इतर संघांचे सर्व सामने हे पाकिस्तानात खेळवण्यात येणार आहेत.. 

बीसीसीआय आणि पीसीबीने 2026 च्या T20 वर्ल्ड कप ग्रुप स्टेज सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात जाणार नसल्याचे तत्वतः सहमती दर्शवली आहे. पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026 मधील सामने हे कोलंबोमध्ये खेळेल. पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळणार आहे. हायब्रीड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केल्यामुळे पीसीबीला कोणतीही भरपाई मिळणार नाही. पण 2027 नंतर ते आयसीसी महिलांच्या कोणत्याही स्पर्धेचे यजमानपद भूषवू शकतात, असे सांगण्यात आले.