कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिवाजी विघापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ 17 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. सकाळी 11 वाजता विद्यापीठ प्राणंगणात होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक् स्थानी राज्यपाल तथा कुलपती एस.पी.राधाकृष्णन यांची प्रमख उपस्थिती असणार आहे.

तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक संशोधन केंद्राचे प्रमुख अशिष लेले हे असणार आहेत. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी 16 जानेवारीला निघणाऱ्या ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनात सर्वांनी सहभागी असे आहवान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र.कुलगुरू प्रमोद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने केले आहे. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष बस सेवाही दिवसभर चालू राहणार आहे.