कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने श्री मुनिसुव्रत स्वामी शेतांबर जैन मंदिर लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे नवकार चेस फाउंडेशनने आयोजित केलेल्या नवकार चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचवा मानांकित सातारच्या अनिकेत बापटने आठ पैकी साडेसात गुण करून अजिंक्यपद पटकाविले. त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. दहावा मानांकित जांभळी चा अभय भोसले, अग्रमानांकित रेंदाळाचा श्रीराज भोसले,तृतीय मानांकित मिरजेचा मुदस्सर पटेल व 21 वा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर या चौघांचे समान सात गुण झाल्यामुळे बखोल्झ टायब्रेक गुणांनुसार जांभळीच्या अभय भोसले ला उपविजेतेपद मिळाले तर रेंदाळच्या श्रीराज भोसले ला तृतीय स्थान मिळाले.

अभयला साडेतीन हजार रुपये व चषक तर श्रीराज ला दोन हजार रुपये चषक देऊन सन्मानित केले. मुदस्सर पटेल अर्णव पोर्लेकर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आले. त्यांना अनुक्रमे दीड हजार रुपये व चषक आणि एक हजार रुपये व चषक देऊन गौरविले. चौथा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, द्वितीय मानांकित सातारचा उमेश कुलकर्णी व आठवा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार या तिघांचे समान साडेसहा गुण झालेमुळे बखोल्झ टायब्रेक गुणानुसार त्यांचा अनुक्रमे सहावा,सातवा व आठवा क्रमांक आला. सहावा मानांकित सातारच्या ओंकार कडवला नववे स्थान तर नववा मानांकित कोल्हापूरच्या प्रणव पाटीलला सहा गुणासह दहावे स्थान मिळाले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री मुनिसुव्रत स्वामी श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलालजी संघवी, ट्रस्टी रमण संघवी व मफतलाल मुथा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवकार फाउंडेशनचे रवी आंबेकर, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,आरती मोदी,अभिजीत चव्हाण,विजय सलगर,संदीप पाटील व उमेश कांबळे उपस्थित होते.

इतर व उत्तेजनार्थ बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे

11 ते 15 क्रमांक अनुक्रमे संतोष कांबळे कोल्हापूर शर्विल पाटील कोल्हापूर सदानंद चोथे सांगली अथर्व चव्हाण कोल्हापूर चिंतामणी करजगी
साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू
राजू सोनेच्या सांगली
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1) संस्कृती सुतार नांदणी 2) अरिना मोदी कोल्हापूर
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
1) पियुष कदम सांगली 2) अथर्व कुंभार सांगली
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) रुद्र माने इचलकरंजी 2) पियुष माने सांगली 3) सौमित्र केळकर सांगली

तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 2) श्रवण ठोंबरे कोल्हापूर 3) रुचित मुके जयसिंगपूर

अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) वेदांत बांगड इचलकरंजी 2) दिविज कात्रूट कोल्हापूर 3) आदित्य घाटे कोल्हापूर

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अवनीश जितकर कोल्हापूर 2) आदिराज डोईजड वारणानगर 3) विहान अस्पतवार