कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतीबंध विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये सचिन बाळकृष्ण मोरे, वय – 44 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास अधिकारी) ग्रामपंचायत परखंदळे आणि बांबवडे, ता. शाहूवाडी , जि. कोल्हापूर आणि प्रथमेश रविंद्र डंबे, वय -22 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास अधिकारी) ग्रामपंचायत साळशी पिशवी ता. शाहूवाडी , जि. कोल्हापूर, ( दोघेही रा. जुने पारगाव, ता. हातकंणगले) यांचा समावेश आहे.
तक्रारदार यांचे सासरे यांचा मृत्यूचा दाखला आणि सासरे यांचे बांबवडे, तालुका. शाहूवाडी, येथील राहते घराचा घरटान उतारा देणेकरिता आलोसे मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम 20,000/- रूपये ची मागणी करून तडजोडी अंती 5,000/- रुपये ची मागणी केली त्यांनतर आलोसे क्र.01मोरे यांचे सांगणेवरून आलोसे क्र. 02 यांनी तक्रारदार यांचेकडून 5000/-₹ लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून दोन्ही आरोपी यांचेविरुद्ध शाहूवाडी पोलीस स्टेशन जि. कोल्हापूर, येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला , पो.हवा, अजय चव्हाण , पो.ना , सुधीर पाटील, पो.कॉ. कृष्णात पाटील, चा.सहा.फौ.कुराडे, लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर यांच्या पथकाने केली आहे.