दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांची ईडी कोठडीची मुदत आज संपली. त्यांना आज, सोमवारी कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यांनतर केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

दरम्यान, कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आज अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीची मुदत संपली. यावेळी ईडीने आज केजरीवाल यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने केजरीवाल यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.