पन्हाळा(प्रतिनिधी) : येथील संजीवन विद्यानिकेतन या निवासी शिक्षण संकुला मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची शंभर टक्केची परंपरा कायम राखली. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक आदित्य तानाजी मिरगणे 95.20%, द्वितीय क्रमांक श्रीतेज लक्ष्मण बुधवार  94.00%, तृतीय क्रमांक वैष्णवी राजेंद्र रसाळ 92.40%, चौथा क्रमांक उत्कर्ष सचिन कर्डिले 91%, पाचवा क्रमांक विघ्नेश पांडुरंग जाधव 90% टक्के यांनी मिळवला आहे.  

गेली तीस वर्षे संजीवनने या निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, मुख्याध्यापक के. के. पोवार, वर्गशिक्षिका श्रद्धा सतीश  कुमठेकर, स्मिता शरद आयरे- गुजर, अमरसिंह पांगे तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.