खास. महाडिक यांच्या निधीतून मंजुर झालेल्या विकास कामांचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह हस्ते शुभारंभ
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून, कोल्हापुरातील खोल खंडोबा आणि शिपुगडे तालीम परिसरातील विकास कामांसाठी निधी देण्यात आला आहे. या विकासकामांचा शुभारंभ, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून कोल्हापुरातील विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी निधी मंजुर झाला आहे. त्यापैकी खोल खंडोबा हॉल परिसरातील वेल्हाळ बाग येथे पॅसेजचे कॉंक्रीटीकरण आणि गटर कामांसाठी २० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे उद्घाटन, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक किरण शिराळे यांच्या हस्ते झाले. या या प्रभागाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक कटिबध्द असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. दरम्यान प्रभागातील नागरिकांनी कृष्णराज महाडिक यांची मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी विशाल शिराळे सुरेश काळे, बाळासो कद्रे, अमरसिंह शिंदे, तात्या यादव, अमोल लिंगम, युवराज पोवार, सुनील पाटील यांच्यासह वेल्हाळबाग परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि माजी महापौर सुनंदा मोरे यांच्या प्रभागातील शिपुगडे तालीम जवळचा कॉंक्रीट पॅसेज बनवण्यासाठी १० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला. येथेही कृष्णराज महाडिक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज मोरे संतोष भोसले, सागर दळवी, सुनील पाटील, राहूल घाटगे, रणजित रजपूत, आर के जाधव, किशोर घाटगे, धिरज मुळे, अमेय भालकर, निलेश हंकारे उपस्थित होते.
गोकुळच्या सुप्रिया चव्हाण यांना सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार…
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. सभागृहात ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते . या परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दुध उत्पादक सभासद सुप्रिया चव्हाण यांना “महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला दूध उत्पादक २०२५” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गौरव केला. सौ सुप्रिया अतिकांत चव्हाण या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावच्या असून गाय ,म्हैस, लहान वासरे असा त्यांच्या ७६ जनावरांचा अत्याधुनिक पध्दतीचा गोठा आहे. त्या रेणुका दुध संस्थेच्या माध्यमातून प्रतिदिन ३०० लिटर दुध पुरवठा गोकुळाला करत आहेत. या वेळी गोव्याचे मंत्री पराग नागरसेनकर यांनी सांगितले की, “गोकुळ दूध संघ हा देशातील एक अग्रगण्य दुध संघ असून गोव्यातील दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाने नेहमीच दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी विविध राज्यांतील दूध उत्पादक, अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधींना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे.गोवा राज्यात दुग्धविकास अधिक वेगाने व्हावा यासाठी गोकुळचे सहकार्य कायम राहील. गोव्यामध्ये गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुप्रिया चव्हाण यांना मिळालेला ‘सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार’ हा केवळ त्यांच्या मेहनतीचा सन्मान नसून गोकुळ परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या यशातून अनेक महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री नीलकंठ हलर्णकर, पशुसंवर्धन मंत्री पराग नागरसेनकर, डॉ. आर. एस. सोधी डॉ. जे. बी. प्रजापती ,नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दुध संघ , गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके ,डॉ. अमित व्यास. तसेच गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.
Big Breaking : वडगाव नगरपरिषद निवडणूक भाजप स्वबळावर ताकतीने लढणार…
पेठवडगाव ( प्रतिनिधी ) : पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर ताकदीने लढविणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात रंग घेत होत्या. सर्वसामान्य वडगावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही अशीच मागणी असल्याचे चित्र तयार झाले होते. भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून आतापर्यंत या मुद्द्यावर अधिकृत बोलणे झाले नव्हते. मात्र आता या मागणीला अखेर मान्यता मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आली आहे. दरम्यान, स्वबळाचा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळत असतानाच, विरोधकांनी उपरोधिक टीका सुरू केली आहे. “भाजपकडे आपल्या मुद्द्यांवर मतदारांना आकर्षित करण्याची आत्मविश्वासाची चाचणी आहे, त्यामुळेच स्वबळाचा पर्याय ते तपासत आहेत,” असा सूर विरोधकांकडून दिसून येतो. मात्र भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे भिन्न आहे. “संघटना सक्षम आहे, वडगावातील मतदारांचा थेट विश्वास पक्षावर आहे,” अशी टिप्पणी काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळते. दरम्यान वडगावमध्ये सध्या यादव आघाडी कडून विद्याताई पोळ या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत तर युवकक्रांती आघाडी कडून श्रीमती प्रविता सालपे या उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पण मागील पंचवार्षिक चे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. युवकक्रांती आघाडी व भाजप महायुती यांच्यात सौख्य असल्याचे सर्वश्रुत आहे. पण भाजप च्या या रणनीतीने कोणाला फायदा होणार ? यामुळे युवकक्रांती आघाडी ला बळ मिळून यादव आघाडी मागे पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Big Breaking : कुरुंदवाडमध्ये ‘त्रिशूल’ टक्कर निश्चित ; जवाहर पाटलांचा ‘मास्टरस्ट्रोक’…
कुरुंदवाड प्रतिनिधी (कुलदीप कुंभार) : कुरुंदवाडच्या राजकीय वर्तुळात सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी एक मोठा 'राजकीय स्फोट' झाला आहे! आतापर्यंत महाविकास आघाडी आणि शाहू आघाडी यांच्यात थेट लढत होणार, असे मानले जात असताना, माजी नगरसेवक जवाहर पाटील यांनी तिसऱ्या आघाडीचा बिगुल फुंकत नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी त्रिशला पाटील यांच्या प्रचाराचा धडाक्यात नारळ फोडून शुभारंभ केला आहे. या एकाच निर्णयाने कुरुंदवाडमधील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली असून, नगराध्यक्षपदाची निवडणूक आता सरळ द्विरंगी न राहता, निश्चितपणे त्रिकोणी लढतीत रूपांतरित झाली आहे. राजकारणाला मिळाली 'कलाटणी'! गेले काही दिवस कुरुंदवाडमध्ये एका तिसऱ्या राजकीय आघाडीची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, आज जवाहर पाटील यांनी थेट आपल्या पत्नी सौ. त्रिशला पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पाटील यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडी आणि शाहू आघाडीसाठी थेट 'धक्का' मानला जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस चे विजय पाटील यांच्या पत्नी योगिनी पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे, तर शाहू आघाडीकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सून मनीषा डांगे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांनी मतदारांशी संपर्क आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे. त्रिशला पाटलांच्या एन्ट्रीने खळबळ एकीकडे महाविकास आघाडी आणि शाहू आघाडीने आपापली मोर्चेबांधणी पूर्ण केली असताना, जवाहर पाटील यांच्या पत्नी त्रिशला पाटील यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली आहे. आजपासून (सोमवार, १० नोव्हेंबर) त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होताच राजकीय वातावरणात कमालीची खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक असलेले जवाहर पाटील यांची स्वतःची ताकद आणि राजकीय अनुभव मोठा आहे. त्यांच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे दोन्ही प्रमुख आघाड्यांना आता आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागणार आहेत. कुरुंदवाडमध्ये आता महाविकास आघाडी, शाहू आघाडी आणि जवाहर पाटील प्रणित तिसरी आघाडी अशा तिघांमध्ये नगराध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीची 'त्रिशूल टक्कर' होणार हे निश्चित झाले आहे! या तिसऱ्या आघाडीमुळे कुणाचे मताधिक्य घटणार आणि कोणाला फायदा होणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापुरात युवासेनेचा पक्ष संघटन मेळावा संपन्न…
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीत एकही क्षण न थांबता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून जनतेची ताकद आपल्या सोबत उभी राहिली. जनतेची ताकद आणि युवा सैनिकांची मेहनत या जोरावर यश मिळाले, आता त्याच ताकदिने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातदेखील जास्तीत जास्त उमेदवारांच्या विजयासाठी तयारीला लागा, अशा सूचना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिल्या. विधानसभेतील विजयानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आणि युवा सैनिकांशी संवाद साधण्यासाठी लगेचच युवा सेनेच्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली होती. या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सोलापूर या जिल्ह्यात युवा विजय महाराष्ट्र दौरा अंतर्गत विविध युवासेनेच्या शाखांची, आणि कॉलेज युनिट ची स्थापना तसेच युवकांचे भव्य मेळावे पार पडले. युवा सेनेच्या या दौऱ्यांमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सर्वत्र भगवा झंजावात निर्माण झाला, असे प्रतिपादन युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी केले. यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेने घेतलेल्या मेहनतीच्या बळावर विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे यश मिळाले, त्याचप्रमाणे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपले जिवाभावाचे मित्र स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये पाठवण्यासाठी सज्ज व्हा. मतदार याद्यांचा अभ्यास करा. यासोबतच जास्तीत जास्त युवकांना युवा सेने सोबत जोडून रिक्त असलेल्या पदांवर तत्काळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करा. जनतेची सेवा करत असताना एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने सदैव कार्यरत असतात त्याप्रमाणेच सदैव कार्यरत रहा, अशा सूचना केल्या. यावेळी युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे,जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, राकेश खोंद्रे,युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे, विपुल भंडारे आदींनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्याला सचिव किरण साळवी, मराठवाडा विभागाचे सचिव बाजीराव चव्हाण, संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण,जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील,श्रीधर जकाते, युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे,शहर प्रमुख मंदार पाटील, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, युवती सेना शहर प्रमुख नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी यांच्यासह युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हॉते.
पंतप्रधान मोदी यांच्या 75 वाढदिवसानिमित्त 75 कि. मी सायकल रॅली काढून दिली मानवंदना……
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत, आज ७५ सायकलपटूंनी ७५ किलोमीटर सायकल रॅली काढली. कोल्हापुरातील सायकलपटूंनी कोल्हापूर ते निपाणी आणि परत कोल्हापूर अशी ७५ किलोमीटरची सायकल फेरी काढून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पध्दतीने मानवंदना दिली. या सायकल फेरीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २१ सप्टेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत, खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. फिट युवा फॉर विकसित भारत, असे ब्रीद वाक्य घेऊन, देशातील सर्व जिल्ह्यांत हा क्रीडा महोत्सव होत आहे. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सायकल रॅलीचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस असल्याने, ७५ सायकलपटूंनी ७५ किलोमीटर सायकलफेरीचे आयोजन केले होते. सकाळी ७ वाजता कोल्हापुरातील ताराराणी चौकाजवळून या रॅलीला सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सायकल फेरीचा शुभारंभ झाला. ताराराणी चौक, शिवाजी विद्यापीठ, गोकुळ शिरगाव मार्गे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन ही रॅली निपाणीकडे रवाना झाली. या रॅलीत ६ वर्षांपासून ७६ वर्षांपर्यंतच्या सायकलपटूंचा सहभाग होता. निपाणी इथल्या हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार झाला. ७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करुन ही सायकल रॅली पुन्हा कोल्हापुरात आली. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात रॅलीत सहभागी झालेल्या सर्व ७५ सायकलपटूंचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरातील सायकलपटूंनी अनोख्या पध्दतीने मानवंदना दिल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक त्यातून प्रेरणा घेऊन फिटनेस वाढवतील, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. सायकल वेडे कोल्हापूर या ग्रुपचे अध्यक्ष राम कारंडे, पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अंकुश पाटील, इंद्रजित बागल, विवेक शिंदे यांनी
ट्रेंडिंग बातम्या
आणखी विषय :
कोरोनाचे मुंबईत 56 रूग्ण : तर पुण्यात वृद्धाला लागण
