वर्धा : कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषी मंत्री दादाजी भुसे दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधत आहेत. आज ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यातील जिल्हा परिषदेतून त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला

तेंव्हा लॉकडाऊनचा फुलशेतीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे प्लास्टिक फुलांवर बंदीसाठी पाठपुरावा करत आहे व प्लास्टिक फुलांवर बंदीबाबत अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः विषय पुढं नेऊ तसेच प्लास्टिक फुलांवर बंदीबाबत लवकरच घोषणा होवू शकते, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.