News Flash

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजीराव भिडे यांच्या चौकशीची शक्यता…

सांगली (प्रतिनिधी) : कोरेगाव-भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाजी भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांच पथक सांगलीत दाखल झाल आहे. या पथकासमोर भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मात्र संभाजी भिडे गुरुजींच्या बाबत मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दंगलीला कारणीभूत  खरे कोण आहेत ?  वडूला मी गेल्या चार ते पाच वर्षात फिरकलो नाही. राजकीय स्वार्थ आणि मतासाठी या दंगलीचा वापर केला जातोय. प्रकाश आंबडेकर यांनी वयाला शोभेल असे वक्तव्य करायला पाहिजे. प्रकाश आंबडेकर यांनी विधान केल्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे.

तसेच, पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत आहे. गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य दंगलीसाठी कारणीभूत आहेत. आधी त्यांना अटक करायला हवी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!