News Flash

बोल्ट, साउदीच्या भेदक माऱ्याने इंग्लंडचा ५८ धावांत खुर्दा

ऑकलंड (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिल्या डावात केवळ ५८ धावात खुर्द उडाला. इंग्लिश फलंदाजांच्या या कामगिरीने चाहते निराश झाले आहेत. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि टीम सौदीच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांची दाणादाण उडाली. बोल्टने ३२ धावा देत ६ बळी तर सौदीने २५ धावा देत ४ बळी घेतले. न्यूझीलंडने दिवसअखेर ३ बाद १७५ धावा केल्या आहेत.

          आज पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या डावाला सुरुवातीपासूनच धक्के बसले. इंग्लंडच्या संघाचे पहिले ९ फलंदाज २७ धावांमध्येच तंबूत परतले होते. क्रेग ओव्हर्टन आणि जेम्स अँडरसन यांनी शेवटच्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केल्यानेच इंग्लंडला अर्धशतकाचा टप्पा पार करता आला. विशेष म्हणजे अँडरसनने फक्त एकच धाव काढली. इंग्लंडची आतापर्यंतची ही सहाव्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी म्हणजे १८८७ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना फक्त ४५ धावांमध्ये सर्व फलंदाज बाद झाले होते.

         रूट, स्टोक्स, बेअरस्टो, मोईन अली, ब्रॉड या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. ओव्हर्टनने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडचीही सुरुवात खराब झाली. रावल हा संघाची धावसंख्या ८ असताना बाद झाला. त्यानंतर विल्ल्यमसन याने प्रथम लॅथम (२६ धावा), टेलर (२०) आणि निकोल्स (नाबाद २४) यांना साथीला घेत संघाला ३ बाद १७५ अशा सुस्थिती नेले. तो ९१ धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडून अँडरसनने दोन तर ब्रॉडने एक बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!